.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, मराठी पदवी अभ्यासक्रमात ‘व्यक्तिमत्व विकासासाठी संभाषण व लेखन कौशल्ये’ या संपादित ग्रंथाचा संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या मराठी विषयाच्या पदवी स्तरावरील अभ्यासक्रमात ‘मराठी भाषिक कौशल्ये’ या संपादित ग्रंथाचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या एम ए हिंदी विषयाच्या अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकात दोन कवितांच्या हिंदी अनुवादाचा समावेश. समकालीन मराठी अनुदित कविता, राजकमल प्रकाशन, दिल्ली (संपादक- सुनील कुलकर्णी देशगव्हाणकर)
फलटण, जिल्हा सातारा येथील प्रगत शिक्षण संस्थेच्या ‘पुस्तक मैत्री अभ्यासक्रम’ पुस्तकात बसराची ग्रंथपाल या भाषांतरित कथेचा समावेश.
संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या पदवी स्तरावरील मराठीच्या अभ्यासक्रमात ‘व्यक्तिमत्व विकासासाठी संभाषण व लेखन कौशल्ये’ या संपादित ग्रंथाचा संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश.
केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली यांच्या पदवी स्तरावरील शास्त्री अभ्यासक्रमात ‘गाव आणि शहराच्या मधोमध’ हा कवितासंग्रह अभ्यासक्रमात समाविष्ट.
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तकांचे संपादन व लेखन